टॉप बातम्या

केळापूर येथे पोषण अभियान कार्यक्रमाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : आज केळापूर येथे पांढरकवडा बीटच्या अंगणवाडी सेविकांनी पोषण अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुमन सोयाम मॅडम आणि पर्यवेक्षिका पेंदोर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 

कार्यक्रमात उपस्थित मातांना पोषण आहार, बालकांच्या वाढ व विकासाबाबत सखोल माहिती देण्यात आली. यावेळी लेखा परीक्षण चार्टद्वारे पोषण आहाराचे महत्व स्पष्ट करण्यात आले. तसेच बाल संगोपनाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात अनेक मातांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली. 

हा कार्यक्रम बालकांच्या पोषणासंदर्भातील जनजागृतीसाठी उपयुक्त ठरला आहे.
Previous Post Next Post