टॉप बातम्या

क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयासमोर अखिल भारतीय खदान मजदूर संघाचे धरणे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कोळसा खदानी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना दुर्घटना झाल्यास एक करोड १५ लाख आणि ठेका कामगारांना ४० लाख रुपये दुर्घटना इन्शुरन्स देण्यात यावा, सीएमपीएफ घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, घोटाळ्यातील आरोपी दोषीवर कारवाई करण्यात यावी, सी एम पी एफ मध्ये ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशा अनेक विविध मागण्यांना घेऊन (ता. 26) रोजी भारतीय कोयला खदान मजदूर संघ च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

वणी नार्थ भालर वसाहत कार्यालयासमोर भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे वणी माजरी क्षेत्राचे महामंत्री जगन्नाथ जेनेकर यांच्या नेतृत्वात कामगारांची सुरक्षा सी एम पी एफ समस्या संदर्भात एकूण १७ मागण्या घेऊन अखिल भारतीय खदान मजदूर संघाच्या वतीने भारतीय कोळसा खदान मजदूर संघ, वणी-माजरी द्वारे गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालया समोर धरणे देण्यात आले.

या वेळी मंगेश अजमिरे सह कोषाध्यक्ष अ.भा.ख.म. संघ, कमलाकर पोटे सदस्य अभाखम संघ, शंकर एडलावार कार्याध्यक्ष, गणेश चौधरी अध्यक्ष वणी नाथ क्षेत्र, क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य गुलाब चौधरी, दिलीप जुनघरी, क्षेत्रीय सुरक्षा समिती सदस्य शरद डवरे, या सह मोठ्या प्रमाणात वेकोली कामगार, कंत्राटदार उपस्थित होते.
Previous Post Next Post