सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : महाराष्ट्र शासनाने युवकांकरिता सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच मोफत नोंदणी शिबिर युवाशक्ती क्रांतिकारी संघटना तर्फे दि. 19/08/2024 सोमवार पासून सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील युवक कार्य कुशल व्हावेत करिता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत बारावी ,आयटीआय, पदविका ,पदवी व पदव्युत्तर उत्तीर्ण युवकांना शासन मानधन तत्वावर सहा महिन्याकरिता लघु आणि मध्यम एस एम इ एस व मोठे उद्योग, सहकारी संस्था, शासकीय,निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था वेगवेगळ्या आस्थापनामध्ये नोकरीची संधी दिली जाणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार 12वी, आयटीआय/पदविका, पदवी/पदव्युत्तरांना मानधन दिले जाणार आहेत. यासाठी युवकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे.
ही योजना जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचून त्यांना रोजगाराच्या संधीची माहिती व्हावी व युवकांना ती संधी मिळवता यावी या कल्याणकारी हेतूने युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेतर्फे नोंदणी व मार्गदर्शन शिबिर राबवण्यात येत आहे.
खालील ठिकाणी योजनेची माहिती व नोंदणी करता येइल :
1) आदर्श नागरी सहकारी पतसंस्था,वणी घरसंसार महासेल च्या बाजुला खराटे सर कॅप्लेक्स, ता वणी
2) आदित्य बिर्ला लाईफ इन्शुरन्स ऑफिस
नगर परिषद कॉम्प्लेक्स वरोरा रोड, रजिस्टर ऑफिस जवळ वणी, ता. वणी
3) माई विल अलाइनमेंट अँड कार वॉशिंग सेंटर नांदपेरा चौक, महावीर चौक ,वणी - वरोरा बायपास ता वणी
संघटनेचे उद्दिष्ट युवकांपर्यंत योजना पोहोचवने व युवकांना नोकरीची संधी मिळविता यावी आहे. उमेदवाराच्या निवडी मध्ये संघटनेचा संबंध नाही. पुढील एका महिन्यापर्यंत नोंदणी शिबिर सुरू राहील
युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नोंदणी शिबिराचे अयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 25, 2024
Rating: