Top News

निळापूर - ब्राम्हणी फाटा चौफुली येथे बस निवारा शेड तातडीने उभारण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील निळापूर - ब्राम्हणी फाटा चौफुली येथे बस निवाऱ्याची नितांत गरज आहे. याठिकाणी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने बसस्थानक शेड उभारा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गट) च्या वतीने काल (ता. 7) ला उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली.

यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष मोबीन शेख, युवा शहराध्यक्ष किशोर काळे, वणी शहराध्यक्ष शादाब अहेमद, अजय कापसे आदी उपस्थित होते.

वणी शहरातील निळापूर ब्राम्हणी फाटा चौफुली वर निळापूर, ब्राम्हणी व इतर गावाकडे जाण्याकरीता शहराचे नागरीक, शाळेचे वि‌द्यार्थी मोठ्या प्रमाणात त्या चौफुलीवर उभे राहतात. त्या चौफुली वर मोठ्या प्रमाणात ट्रक गाड्या चालतात.या रस्त्यावर भरधाव वाहने धावतात. परिणामी रस्त्यावर अपघात होण्याचे जास्त प्रमाण आहे. असेही नमूद आहे. 

या ठिकाणी अनेक नागरीक, विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहावे लागते, त्या रस्त्यावर कोल माईन्सच्या कोळश्याचे ट्रक चालतात, त्या ट्रक ने मोठ्या प्रमाणात धुर निघते व तेथे धुरीचे साम्राज्य निर्माण होऊन त्या धुरीने रस्त्यावर चालणारे इतर वाहने व चालकांना रस्ता दिसत नाही त्यामुळे एखादा अपघात घडू शकतो हे नाकारता येणार नाही,या पुर्वी त्या चौफुली वर अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी आणि नागरिक विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या चौफुली वर बस निवाऱ्याची तिथे आवश्यकता आहे. या ठिकाणी तात्काळ नागरिकांसाठी बस स्थानक शेड तातडीने बनवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे. 
Previous Post Next Post