काँग्रेसची वणी विधानसभेची सीट कोणाच्या पत्यावर?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावरच येवून ठेपली असल्याने नागरिकात नानाविध चर्चा आता होऊ लागल्या आहे. तूर्तास काँग्रेस मध्ये डझन भर उमेदवार दावेदार झाल्याने काँग्रेस मध्ये आता चुरस असल्याचे अग्रीम चर्चा ऐकायला मिळतंय. 
मागील पाच महिन्याअगोदर लोकसभेचा धक्कादायक निकाल लागल्याने अनेकांना आपली आगामी गोल्डन जुबली चित्रपट हिट होईल असे वाटत असल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मधूनच 22 उमेदवारी अर्ज वरिष्ठा कडे दाखल झाले. अशी राजकीय सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यामुळे सगळेच कसे डोळ्यात अंजन घालून कशी आचारसंहिता ची ते वाट पाहत आहेत असे म्हटलं जात.

खरंतर...काँग्रेस कडून कोणत्या उमेदवाराला सीट मिळणार हा प्रश्न कार्यकर्त्यांसह जनतेला पडलेला आहे. कार्यकर्ते इकडून तिकडे आणि तिकडून इकडे कानोसा घेत आहेत. उमेदवारीसाठी पुरुष उमेदवारासह महिला उमेदवार ही दावेदारी करत आहे.
मागील काही महिन्यापासून महाविकास आघाडीत बिघाडी तर येणार नाही खास करून वणी विधानसभा मतदार संघात, असंही चर्चेला उधाण आहे. कारण "तुम्ही लोकसभा लढवली, आता आम्ही विधानसभा लढवू " असंही बोलल्या जात असल्याने महाविकास आघाडी काय निर्णय घेते तेही महत्वाचे ठरणार आहे. त्यातही वणी मतदार संघातील एकच पक्ष आणि गट ही एकच, मात्र दोन उमेदवार परस्पर आमने सामने जोर लावत आहेत. त्यांच्या एकीकडे कार्यक्रमाचा धडाका तर दुसरीकडे आरोपांच्या फैरी. असे वातावरण आहे. एकूणच पायलीचे पंधरा उमेदवार एकाच पक्षातील उमेदवारी दाखल करून घमासान करत आहेत. ऐन निवडणूकीच्या तोंडावर विविध पक्ष कार्यक्रमाचा धडाका लावून लोकांचे मनोरंजन होत आहेत अशी चर्चा आता मतदारात जोर धरत आहे. 
"ज्यांचं नाही कोणी त्यानं जावं वणी, वणीही बहु्गुनी" असं म्हटलं जातं. या वणीत अनेक धुरंधर जनतेनी अजमावले किंबहुना आजतागायत अजमावत आहेतच. सामाजिक, राजकीय क्षेत्रात भरीव योगदान तसेच विविध आंदोलने व तळागाळातील सामान्य माणसात, जनतेत असलेला दांडगा जनसंपर्क, आर्थिक दृष्ट्या सक्षम, अनेक वर्षाचा राजकारणाचा अनुभव, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले लोकं इथं पाहायला मिळतात. त्यामुळे काँग्रेस ची उमेदवारी कोण्याच्या पत्यावर जाणार? हे मात्र, अजूनही निश्चित नाही, मात्र चर्चा एकाच नावाची होतांना सध्या चर्चे दरम्यान ऐकण्यात येतेय. 
विशेष म्हणजे, काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार हे राजकीय क्षेत्रात मुरब्बी व्यक्तिमत्व किंबहुना वणी मतदार संघांचे किंगमेकर म्हणून समजले जाते. ते स्वतःला उमेदवारीसाठी प्रयत्न करतील का? किंवा आपल्या गोट्यातील लोकांना संधी देतील, किंवा नवीन तरुण चेहरा वणी विधानसभेसाठी उभा करतील,असे सुद्धा राजकीय सामाजिक विश्लेषक यांनी मत मांडले आहे. 
वणी विधानसभेतील उमेदवारीची माळ काँग्रेस पक्ष कोणाच्या गळ्यात टाकतात, हे तूर्तास अधिकृतरित्या सांगता येत नसले तरी वणी विधानसभा करिता एकूणच "भक्कम" उमेदवारी अर्ज दाखल केल्याने "मैं नही तो और सही" असा बहुमताने धक्का मात्र, देणार का? हे येणारा काळच सांगेल....
काँग्रेसची वणी विधानसभेची सीट कोणाच्या पत्यावर? काँग्रेसची वणी विधानसभेची सीट कोणाच्या पत्यावर? Reviewed by सह्याद्री चौफेर on August 19, 2024 Rating: 5
Powered by Blogger.