दरोड्या टोळीला शिरपूर पोलिसांनी केली अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील चिंचोली फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला शिरपूर पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले.

सोमवार १५ जुलै रोजी रात्री शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे हे मोहरम सणानिमित्त परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, चिंचोली फाटा परिसरात काही तरूण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेले आहेत,त्या माहितीच्या आधारे ठाणेदार माधव शिंदे यांनी आपली टीम घटनास्थळी दाखल होऊन सापळा रचून सात आरोपींना ताब्यात घेतले आहे.

त्यात अनिल कल्लु निषाद (27), सुनील कल्लु निषाद (30) रा.रामनगर राजूरा.निलेश मधुकर बावणे (25) रा.मुंगोली. ता.वणी, बंडल निषाद (28) वर्ष रामनगर राजूरा, प्रफुल चौधरी 25 घुग्गुस, संकेत भोजेकर (21) रा. एकोडी ता. कोरपना, व एक विधिसंघर्ष बालक अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपी कडून दरोड्यातील साहित्य लोखंडी रॉड, आरीपत्ता, पेंच्निस, पेचकस व गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची इंन्डिगो माझा कंपनीची कार असा एकूण 2,42,170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई डॉ. पवन बन्सोड पोलिस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे, रामेश्वर वैजने पांढरकवडा, पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्था.गु.शा.यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार माधव शिंदे, पोउपनि रावसाहेब बुधवत, पोहेकॉ सुनील दुबे, गंगाधर घोडाम, प्रशांत झोड, निलेश भुसे, गजानन सावसाकडे, अमित पाटील, विनोद मोतेराव, चालक विजय फुल्लुके यांनी केली.