सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरात सुगंधित तंबाखू व गुटख्यांची सर्रासपणे खुलेआम विक्री सुरू आहे. अशा आशयचे निवेदन पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी यांच्या मार्फत संबंधित विभाग यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने देण्यात आले.
शहरात खुलेआम विक्री सुरू आहे. अनेक युवक या तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेले आहेत. मात्र, संबंधित विभागासह वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करीत असून त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. गुटखा विक्रीवर सरकारचे कडक निर्बंध असतानाही शहरात सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
संबंधित विभागाला ही बाब माहिती असतानासुद्धा जाणूनबुजून याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे सुजाण नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक वणी शहरात मोठे दुकानदार व व्यापारीवर्ग खुलेआम गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री करीत आहेत. या गुटख्यांच्या व सुगंधित तंबाखूच्या कारवाया फक्त लहान पानठेले यांच्या वर कारवाई होतांना दिसतात. एकीकडे शासनाने या सुगंधित तंबाखू व गुटख्यांवर बंदी लादली तर दुसरीकडे वणी शहर व तालुक्यात याची विक्री खुलेआम सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवणारे पथक गेले कुठे, असा प्रश्न सुजाण नागरिक विचारत आहेत. वरिष्ठ अधिकार्यांनी या बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन वणी व तालुक्यातील होत असलेली सुगंधित तंबाखू व गुटख्यांची विक्री थांबवावी, अशी मागणी शादाब अहेमद इकबाल अहेमद शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. निवेदनावर शादाब अहेमद इकबाल अहेमद सह किशोर काळे, अशपाक खान, धनराज रासेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ही एक गांभीर्यपूर्ण समस्या आहे. यावर कार्यवाही करावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आंदोलन करण्यात येइल,असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे.
प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याची खुलेआम विक्री
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 22, 2024
Rating: