सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
तालुक्यातील टाकळी येथील निवासी आई पल्लवी व अवघ्या १४ महिन्याची आईच्या कुशीत झोपलेल्या काव्या ही खाली निद्राव्यस्थेत होती. अशातच मध्यरात्री दोन वाजताचे सुमारास लांब लचक मन्यार जातीचा साप त्यांच्या अंथरुणात शिरला व काव्याच्या हळूच पायाला चावा घेतला. दंश करताच छकुली काव्या रडायला लागली. रडण्याचा आवाज येताच आईला जाग आली अन शेजारी विषारी साप निदर्शनास आला. दरम्यान आरडाओरड करताच शेजारील काहींनी तो साप पकडला.
काव्याला लगेचच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे ठोस उपचारपद्धती नसल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलवित असतांना काव्याचा सकाळी सहा वाजता दुर्देवी अंत झाला. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
काव्याचा दुर्देवी अंत : साखरझोपेत छकुलीला सापाचा दंश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 30, 2024
Rating: