शिक्षकांचे गतवैभव काळाच्या पडद्याआड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शिक्षक संघटनेचे नेते, इब्टा संघटनेचे विदर्भ प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ता दिवाकर राऊत यांचे नागपूर येथे उपचाररादरम्यान मिडास हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. शिक्षकांसाठी लढणारा एक अष्टपैलू योद्धा म्हणून ओळख असलेले दिवाकर राऊत आज काळाच्या पडद्याआड गेले.

शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांनी संघटना स्थापन केली होती, या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न शिक्षकांचे निकाली काढले होते. संघटना जिल्ह्यात वटवृक्ष झाला होता गेल्या काही दिवसापासून ते तणावात होते यवतमाळतील शिक्षक पदोन्नती प्रकरणांमध्ये त्यांच्यावर काही आक्षेप घेण्यात आले आणि कारवाईत त्यांना निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून ते तणावात गेले. 

त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि उपचार दरम्यान,अचानक प्रकृती अस्वस्थ झाली आणि काही समजण्या पहिलेच त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला. त्यांच्या मागे दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे.
शिक्षकांचे गतवैभव काळाच्या पडद्याआड शिक्षकांचे गतवैभव काळाच्या पडद्याआड Reviewed by सह्याद्री चौफेर on April 29, 2024 Rating: 5
Powered by Blogger.