सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
चक्राकार वाऱ्यांच्या विस्कळीत स्थितीमुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवली असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचाही अंदाज आहे.
दरम्यान, राज्यात तापमानाचा पारा चढाच असल्याचे पहायला मिळत आहे. काल मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ४३ अंशांच्या वर तापमान गेल्याची नोंद झाली. विदर्भातही सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदवले गेले. कोकण किनारपट्टीवर सध्या उष्ण व आर्द्र तापमानाची नोंद होत असून उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील आठवडा आणखी तापणार!
राज्यात पुढील आठवड्यात कमाल तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असून नागरिकांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे.
आज कुठे कसे हवामान?
कोकण किनारपट्टी भागात आज उष्ण व आर्द्र हवामान राहणार असून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे.
तर सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव,अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज 'या' भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 28, 2024
Rating: