स्पीडब्रेकर्सचा धोका: अपघातांवरील उपायच ठरतोय जीवघेणा!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कोरंबी (मारेगाव) समोरील रस्त्यावर जास्त उंचीचा गतिरोधक  उभारण्यात आला आहे. तो वाहनचालकांच्या पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे पंधरवाड्यात किरकोळ सह गंभीर अपघात घडले आहेत.

मागील आठवड्यात तालुक्यातील दहेगाव (घोंसा) येथील एक महिला ही स्पीडब्रेकरमुळे उसळून खाली पडली, ती गंभीर जखमी झाली असून तीच्या वर चंद्रपूरला येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु या मार्गांवर प्रवास करताना अनेक किरकोळ व गंभीर अपघात घडत असून येथील ब्रेकरची उंची आणि त्यावर रंगरंगोटी केली नसल्याने असे अपघात घडतात, तरी असे अपघात पुन्हा टाळण्यासाठी स्पीडब्रेकरची उंची कमी करा नाहीतर ब्रेकरच हटवा अशी मागणी होत आहे.
परिणामी रस्त्यावरील अनावश्यक गतिरोधकांमुळे वाहनाची गती, वेळ, इंधन, वाहनांचे नुकसान, खर्चावर परिणाम होत आहे. तसेच जास्त उंचीचा रंगहीन गतिरोधक असल्याने त्याचा त्रास मात्र वाहनधारकांना होत आहे. सर्व काही ढोबळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे समजेल तितकेच अनुकरण प्रशासन करीत आहे. अशी ओरड नागरिकांसह प्रवाश्यातून होत आहे.

काय असावे...
‘पुढे गतिरोधक आहे’ असे गतिनियंत्रण सूचना फलक आवश्यक, पट्टे आवश्यक व ते वेळोवेळी रंगविणे,मार्गांवर मोजकेच ‘रबलिंग’ असावे.

स्पीडब्रेकर्सचा धोका: अपघातांवरील उपायच ठरतोय जीवघेणा! स्पीडब्रेकर्सचा धोका: अपघातांवरील उपायच ठरतोय जीवघेणा! Reviewed by सह्याद्री चौफेर on April 28, 2024 Rating: 5
Powered by Blogger.