शेतातील बंड्यात साठवून ठेवलेली मिर्ची गेली चोरीला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या रासा शिवारात रस्तालगत असलेल्या एका शेत बंड्याचे कुलूप तोडून सहा पोते सुकेलेली मिरची अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना 25 एप्रिल रोजीच्या रात्री घडली.

भारत कुमरे रा.वणी असे शेतकऱ्याचे नाव आहे. यांचे शेत घोंन्सा मार्गावरील रासा शिवारात रस्ताच्या लगत असून शेतात शेतीउपयोगी साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी बंडा बांधलेला आहे. त्यांनी शेतात लावलेली मिरची तोडून बंड्यात ठेवली होती. दरम्यान,मिरची चे दर बाजारामध्ये घसरण असल्याने ती मिरची सध्या शेतातील बंड्यामध्ये साठवून ठेवली होती. मात्र, या जमा करून ठेवलेल्या बंड्यातील मिरची वर अज्ञात चोरट्यांनी गुरुवारच्या रात्री डल्ला मारल्याने शेतकरी भारत कुमरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

जगाच्या पोशिंद्याने शेतात राबराब राबून पिकवलेले मिर्चीचे पिक कुलूप तोडून नेल्याने शेतकऱ्यांचे मनोबल ढासळले असून याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे कुमरे यांनी माध्यमातून सांगितले आहे.
शेतातील बंड्यात साठवून ठेवलेली मिर्ची गेली चोरीला शेतातील बंड्यात साठवून ठेवलेली मिर्ची गेली चोरीला Reviewed by सह्याद्री चौफेर on April 29, 2024 Rating: 5
Powered by Blogger.