सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : परिसरातील दिवसागणिक चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना येथील जैन ले-आऊट मधील घरासमोर दुचाकी लावलेली होती. बुधवार 13 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घरासमोर उभी असलेली मोटारसायकल चोरट्यांनी पळवली. याबाबत पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ललित मोहन ढेंगळे यांनी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास आपली स्प्लेंडर कंपनीची, दुचाकी क्रमांक (एमएच 31 बीएफ 7133) आपल्या घराजवळ लावली. सकाळी दुचाकी दिसून आली नाही. मग त्यांनी आजूबाजूला शोधाशोध घेतला असता दुचाकीबाबत माहिती काहीच मिळाली नाही. ललित यांनी वणी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोहेको सुदर्शन वानोळे करीत आहे.