टॉप बातम्या

भारतमाता भाग्यविधाता अभिमानाने पवन कुसुंदल सांगतात



भारतमाता भाग्यविधाता

भारतमाता भाग्यविधाता
नटली विविधतेने
नेतृत्व करते साऱ्या जगाचे
तुम्हा सांगतो अभिमानाने

बलिदानाची भूमी अपुली
त्यागाची अनोखी रीत
भारतवासी एकमुखाने
गाती स्वातंत्र्याचे गीत

इतिहास लाभला या भूमीला
असंख्य अमर हुताम्यांचा
जागर करती स्वातंत्र्याचा
गुणगौरव देशभक्तीचा

भाव भरतो एकात्मतेचा
ध्वज तिरंगा दौले नभात
अखंड भारत वर्ष गर्जतो
सिंहगर्जना उभ्या जगात

वैरभाव मिटवून एक करते
छत्र तुझे उपकाराचे
नमन तुला हे भारतमाता
तुझ्याच देशभक्तांचे


Previous Post Next Post