सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख
कळंब : तालुक्यातील कात्री येथिल रहिवासी व सध्या शिवरामजी मोघे महाविद्यालय, पांढरकवडा येथील इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. राहुल दखणे, यांच्या "धम्मचक्र प्रवर्तना नंतरचे आपण" या पुस्तकाचा समावेश संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती च्या एम. ए. इतिहास विषया करिता अभ्यासक्रमामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून करण्यात आला आहे. धम्मचक्र प्रवर्तनामुळे झालेल्या बदलांचा लेखाजोखा प्रस्तुत पुस्तकात मांडण्यात आला आहे.
एम. ए. इतिहास विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच पुरोगामी चळवळीतील अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय डॉ. संतोष बन्सोड सिनेट सदस्य तथा समन्वयक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अध्यासन केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती तसेच इतिहास अभ्यास मंडळाचे सर्व सदस्यांना दिले आहे.
त्यांच्या यशाबद्दल मा. श्री. विजयराव मोघे संस्था सचिव तथा सिनेट सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी कौतुक केले आहे. तसेच प्राचार्य डॉ. अजय सोळंके, प्रा. डॉ. अरुण दसोडे, प्रा. नरेश महाजन, डॉ. प्रदीप झिलपिलवार, प्रा. डॉ. किशोर गोमेकर, प्रा. डॉ. राधेश्याम चौधरी प्रा. डॉ. गजानन फुटाणे, प्रा. डॉ. उल्हास राठोड, प्रा. डॉ. सुजाता शेंडे, डॉ. एकता मेनकुदळे तथा महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रूस्तम शेख व समाजातील गणमान्य व्यक्तींनी अभिनंदन केले आहे. कळंब तालुक्याकरिता ही निश्चितच गौरवाची बाब आहे.