सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
चार किलोमीटर दौड असणारी ही स्पर्धा दोन गटांत होणार
‘अ' गटात 12 ते 16 मुले मुली व " ब गट' 17 वर्षा वरील मुले व मुली असे दोन विभाग आहेत. प्रत्येक विभागात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये रोख तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख ही पारितोषिके, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
सर्व वयोगटातील पहिल्या खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू असून विदर्भातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केळापूर, मारेगाव, चंद्रपूर, देवरी, पुसद, सावनेर, झरी, वणी, यवतमाळ, नागपूर, वरोरा, अमरावती, गोंदिया येथील धावपटूंनी नोंदणी केली असून 27 ऑगस्ट पर्यंत नोंदणी सुरू आहे.
या स्पर्धेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी व धावपटूंनी सहभागी व्हावे असे, आवाहन लोटि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे आणि वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्युनिअर अँड सिनियर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत गोडे यांनी केले आहे.