सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत करंजी कडून येणाऱ्या ट्रकची दुचाकीला जबर धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज रविवारला दुपारी 1 वाजताचे सुमारास घडली.मुकेश ज्ञानेश्वर आडे (वय 28) रा.बुरांडा असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
करंजी हायवेकडून येणाऱ्या भरधाव ट्रकनी दुचाकी वरून जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार लागला. यातच मुकेश हा जागीच ठार झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. यादरम्यान, अपघातग्रस्त ट्रक वाहणासह घटना स्थळावरून पोबारा केल्याची समजते.