सह्याद्री चौफेर | राजू डावे
प्रफुल विलासराव परचाके (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रफुल हा मूळ वणी शहरातील सेवा नगर येथील रहिवासी असून, तो आपल्या आई वडिलासह सेवा नगरात राहत होता. आज सोमवारी त्याने राहत्या घरात आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला, त्याचे पश्चात आई वडील, भाऊ, एक बहीण असा आप्त परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे करण अस्पष्ट असून याप्रकरणी अधिक तपास वणी पोलिस करीत आहेत.
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सेवा नगर येथील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 05, 2023
Rating:
