व्यवस्था परिवर्तनातील क्रांतिकारी योद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर - गीत घोष

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : बाबासाहेब हे एक जगातील दलित, शोषित, पिडित सर्वहारा मुक्तीचा तंत्रज्ञान असून मानव मुक्तीचा सम्यक मार्ग असल्याने ते व्यवस्था परिवर्तनातील क्रांतिकारी योद्धा असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गीत घोष यांनी केले. ते सवर्ला येथील सम्यक बौद्ध मंडळ द्वारा आयोजित 132 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जयंती महोत्सव तथा गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्ती अनावरण सोहळ्याचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

सम्यक बौद्ध मंडळ,लुंबिनी महिला मंडळ, सार्व. नवदुर्गा मंडळ, शिवजयंती उत्सव समिती, गुरुदेव सेवा मंडळ, पदावली भजन मंडळ, बिरसा मुंडा बिग्रेड सावर्लाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याचे अध्यक्ष मा.डॉ. भालचंद्रजी चोपणे माजी. कुलगुरू नागपूर, विशेष अतिथी म्हणून मा.श्री. संजीव रेड्डी बोदकुरवार हे होते, प्रमुख पाहुणे सौ.कुंदाताई चोपणे, सरपंच ग्रा.पं.सावर्ला, अशोक सुर, अध्यक्ष वि.कार्यकारी सो.नायगाव, मारोतरावजी चोपणे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सावर्ला, नथ्थुजी सोमलवार अध्यक्ष तंटामुक्ती समिती, सावर्ला हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून मा.प्रा.डॉ. वैजनाथ अनमुलवाड, स्वामी रा.ति.मरा. विद्यापीठ, नांदेड,प्रा.संजयरावजी बोधे सर, समाजिक विचारवंत, वरोरा, गीत घोष, राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा.संवैधानिक हक्क परिषद, वणी, रघुनाथजी कांडाळकर साहेब, वणी हे होते.

पुढे बोलतांना गीत घोष म्हणाले,बाबासाहेबांनी दोन व्यवस्था उलथून पाडल्या आहेत त्या म्हणजे बौद्ध धम्माची आपल्या अनुयायासोब दिक्षा घेऊन मनूवादावर आधारीत हिंदू धर्माचा त्याग करुन समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायावर आधारीत वैज्ञानिक बुध्द धम्माचा स्वीकार आणि पुरोहितशाहीवर आधारीत राज्यव्यवस्था बदलून लोकशाही समाजव्यवस्था निर्माण केली व भारतीय माणसांना धार्मिक गुलामीतून मुक्ती देवून संधिची समानता आणि प्रत्येक माणसाला समानतेची संधी प्राप्त करुन देणारे संविधान या देशाला दिले.

या प्रसंगी प्रा.संजय बोधे सर यांनी ओ.बि.सी.च्या प्रश्नांवर आपली भुमिका मांडून बाबासाहेब हे आमचे मुक्तीदाता असल्याचे प्रतिपादन केले. या वेळेस सर्व वक्त्यांनी आपापल्या विषयावर भाष्य करुन हा देश एकसंघ टिकून ठेवायचा असेल तर आपण सर्वां सर्व भेद विसरून भारतीय राज्यघटनेची सुरक्षा करण्यावर भर दिला.गावातील सर्व समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित करुन एकतेचे दर्शन घडवेल.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन, देवानंदजी मुनेश्वर, विक्रम तामगाडगे यांनी केले, प्रास्तविक, शामरावजी देठे तर आभार भाऊरावजी राऊत यांनी मानले.
व्यवस्था परिवर्तनातील क्रांतिकारी योद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर - गीत घोष व्यवस्था परिवर्तनातील क्रांतिकारी योद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर - गीत घोष Reviewed by सह्याद्री चौफेर on April 19, 2023 Rating: 5
Powered by Blogger.