सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : वाढत्या महागाई आणि घटलेले उत्पन्न यावरून आक्रमक बनलेल्या यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने आज दि.13 मार्च सोमवारी वणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केंद्र सरकार यांना निवेदन देण्यात आले. गॅस वाढ व वाढती महागाई तसेच जीवनाश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती या मागणीला घेऊन जिल्हा उपाध्यक्ष मुबीन पीरसाहेब शेख यांच्या नेतृत्वात वणी तहसील कार्यालय समोर वाढत्या महागाई व गॅस वाढ चा जोरदार निषेध करण्यात आला.
गॅस वाढ व वाढती महागाई मुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली असून, या सरकार च्या विरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक बनली आहे. जिल्हा उपाध्यक्ष मुबीन शेख यांनी "हेच का अच्छे दिन" गोरगरीब जनतेला लुटण्याचं काम केंद्रातील सरकार करित असल्याचा आरोप यावेळी शेख यांनी केला. खोटं बोलून जनतेला फसवण्याचं काम मोदी सरकार करतेय आहे. परंतु आता हे जास्त दिवस चालणार नाही, आम्ही दिलेल्या निवेदनावर, आमच्या मागणीवर विचार केला जाणार नाही तर राष्ट्रवादी च्या वतीने तीव्र आंदोलन उभारू असे ते सह्याद्री चौफेर ला बोलतांना सांगितले.
वाढत्या महागाई मुळे महिलांचे बजेट कोलमडले असून परत चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ या केंद्रातल्या सरकार आणली. तसेच दुध, भाजीपाला,इंधन व इतर सामग्री भयंकर किंमती वाढल्याने आज या समस्येबाबत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून वणी उपविभागीय अधिकारी, यांच्या मार्फत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी तालुका अध्यक्ष मोबीन शेख, प्रणय बलकी, प्रज्योत बरडे, कार्तिक वनकर, शकील अहेमद, यांचे सह असंख्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.