सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार
पांढरकवडा : येथील रजनीकांत बोरेले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेन्द्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.पोलीस अधिक्षक पवन बन्सोड आणि पियुष जगताप अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या यांच्या अलिखीत परवानगीने जिल्ह्यात वरली मटका, तीन पत्ता जुगार, क्रिकेट सट्टा, अवैध दारू, अवैध वाळू वाहतुक, कोंबड बाजार, अवैध वाहतुक खुलेआम सुरु आहे, असे सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे तसेच अवैध व्यवसाय यांचेकडून महिन्याकाठी एक कोटी रुपये वसुलीची तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि ईडी यांचेकडून करण्यात यावी अशी तक्रार बोरेले यांनी केली असल्याचे आज त्यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
५/११ /२०२२ रोजी जिल्ह्यात हप्ते घेऊन राजरोसपणे सर्व प्रकाराची अवैध धंदे सुरु असल्याची तक्रार मुख्य अप्पर गृह सचिव पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरिक्षक व पवन बन्सोड जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडे केली होती. यावर अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी बोरेले यांना दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्र पाठवून कळविले होते. अवैध धंदे करणारे लोकांवर कार्यवाही करणे बाबत लेखी पत्र सर्व ठाणेदार यवतमाळ जिल्हा पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना देण्यात आले आहे.असे आदेश दिल्यानंतर सुध्दा जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची काय हिम्मत की त्यांच्या पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत सर्व प्रकाराचे अवैध धंदे सुरु ठेवायची.तरी सुध्दा संपुर्ण जिल्ह्यात खुलेआम अवैध धंदे सुरूच आहे.
जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंदयाकडे पोलीस यवतमाळ अधिक्षक हे पाठ दाखवित आहे. पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अवैध धंदे सुरु ठेवण्याचे अलिखीत परवाना पोलीस अधिक्षक पवन बन्सोड आणि अप्पार पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी दिला आहे असा आरोप बोरेले यांनी यावेळी केला व जिल्ह्यातील सर्व प्रकाराचे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे आणि पोलीस अधिक्षक पवन बन्सोड व अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप आणि जिल्ह्यातील सर्व ठाणेदारां विरुध्द कार्यवाही करण्यात यादी अशी गंभीर बाबींची दखल घेऊन रजनीकांत बोरेले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे तक्रार केली आहे.