सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या अनुषंगाने विविध पक्षाच्या भेटी गाठी सुरु झाल्याचे दिसून येत असताना प्रहार जनशक्ती पक्षात पक्ष प्रवेश सोहळे संपन्न होत आहे,शनिवारी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला.
वणी शहर प्रमुख पदी सय्यद अहेमद, वणी शहर उपाध्यक्ष पदी शेख आमीर तर तालुका सहसचिव पदी जनार्दन शंकर टेकाम यांची नियुक्ती करण्यात आली. उपजिल्हा प्रमुख मुबीन शेख यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे नियुक्ती पत्र देण्यात आले असून यात शेख आमीन शेख अमिर, साहिल नासीर खां पठाण, अमिज खाँ अकबर खाँ, विजय बुराडे, अंकुश चव्हाण, पवन ठाकुर,नरेश ठाकुर, रवि ठाकुर, आशीष ठाकुर, चंद्रकुमार पटेल, नरेश पटेल, नानू ठाकूर आदींचा समावेश आहेत.
यावेळी पक्षाचे सर्वेसर्वा मा. बच्चू भाऊ कडू यांची भूमिका, कार्य पटवून देत उपजिल्हा प्रमुख मोबीन यांनी केले स्वागत व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..