वेकोलीत यंत्रणाला लागली आग ; जुनाड खाणीतील घटना

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणी तालुक्याचा बहुतांश भू-भाग हा कोळसा खाण व्याप्त आहे. त्यामुळे आजू बाजूला कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र याच खाण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने वेकोली प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रत्यय दि 22 जानेवारी रोजी दिसून आला.
वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहे. या खाणीत कोट्यावधीची उलाढाल होत असते. अशातच जुनाड खाणीत रविवारच्या पहाटे पाच वाजता च्या सुमारास मातीचे ढीगारे उचलन्याचं काम सुरू असतांना पीसी मशीन ला अचानक आग लागली. आगीने चांगलाच भडका घेतल्याने एकच तारांबळ उडाली. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच वेकोली प्रशासन दाखल होताच आगीवार नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र कोट्यावधी ची उलाढाल, भरमसाठ सुविधा, तरी देखील सुरक्षेच्या नावाचा बोजवारा उडाला असून येथील अग्निशमन विभाग सुद्धा मावळला की काय असे चर्चील्या जात आहे.
येथील ठेकेदारी पद्धतीने काम काम करणाऱ्या यंत्राला आग लागली असतांना सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून पीसी मशीन चे मोठे नुकसान मात्र, झाल्याचे समजते.
माती उचलण्याचं काम सुरू असतांना जास्त प्रेशर निर्माण झाल्याने शॉट सर्किट होऊन यंत्रणाला आग लागली असावी असा कयास आहे. तूर्तास सुरक्षेच्या दृष्टीने वेकोली प्रशासनाचा ढिसाळपणा मात्र दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे.
Previous Post Next Post