सह्याद्री चौफेर | नितेश वनकर
मारेगाव : वनोजा देवी ग्रामपंचायतचे नवनिवार्चित उपसरपंच प्रशांत भंडारी यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्रबोस व शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती साजरी करण्यात आली.
या निमित्त आज सोमवार दि 23 जाने.ला सकाळी 10 वा ग्रामपंचायत कार्यालय येथे शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे व आजाद हिंद सेना चे प्रमुख नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या प्रतिमेला उपसरपंच प्रशांत भंडारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित उपसरपंच प्रशांत भंडारी, सचिव परचाके, रोजगार सेवक सिद्धार्थ खैरे, राम बरडे, नईम शेख, अशोक आत्राम इत्यादीचा समावेश होता.