टॉप बातम्या

"शेतकरी शेतमजूरांची संघर्ष दिंडी"


महाराष्ट्र राज्य किसान सभेची वणी ते नागपूर पदयात्रा 

सह्याद्री चौफेर | राजू डावे

वणी : महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी ते नागपूर पदयात्रा दि. २१ डिसेंबर ला सकाळी ६ वाजता निघणार आहे. त्या अगोदर २० डिसेंबर २०२२ रोजी वणीतील टिळक चौक येथे दुपारी ४ वाजता जाहीर सभा होणार आहे. रात्री शेतकरी मंदिर येथे मुक्काम असून सकाळी सहा वाजता पदयात्रा वणी ते नागपूर कडे रवाना होतील अशी माहिती कॉ अनिल घाटे यांनी दिली.
बदलत्या राजकीय परिस्थितीत सतत नवनवे उच्चांक गाठत असल्याने महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. कोट्यावधी लोकं दारिद्र्यात ढकलले जात असून त्याची उपासमारीने तडफड होऊ लागली आहे. बेरोजगारीने कळस गाठला आहे. उद्योगाचे,जमिनीचे, बँकेचे, रेल्वे, शिक्षण, आरोग्य, यांचे खाजगीकरण करून देश विकणे सुरु आहे. अनेक प्रश्न दररोज आवापासून उभे राहते आहे. या प्रश्नाला बगल देऊन केंद्र व राज्य सरकार जात धर्म, हिंदू मुसलमान, देश द्रोही आतंकवादी, खलिस्तानी, नक्षलवादी, मंदिर मस्जिद, असे अनेक वाद निर्माण करून जगणे कठीण होऊन देशात व समाजात संभ्रमाचे भावनात्मक, देशभक्ती चे खोटे आभास निर्माण करून सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न निर्माण करून त्यांचे जगणे कठीण करून भावनात्मक व हुकूमशाहीचे वातावरण तयार करित आहे.
या सर्व परिस्थितीतून जाणीव करून देण्यासाठी कॉ राजन क्षीरसागर, राज्य सचिव म. रा. कि सभा, कॉ तुकाराम भस्मे भाकप सचिव मंडळ, सदस्य यांच्या नेतृत्वात २६ डिसेंबर ला दुपारी १२ वाजता दिक्षाभूमी नागपूर येथून विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात राज्यातील २८ जिल्ह्यातून हजारो शेतकरी सामील होणार आहे. तेव्हा समाजातील सर्व जनतेनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन कॉ अनिल घाटे, कॉ धनंजय आंबटकर, कॉ अनिल हेपट, कॉ डॉ तांबेकर, कॉ बंडू गोलर, कॉ सुनील गेडाम, कॉ प्रवीण रोगे, कॉ याश्मिन शेख, कॉ इंदिरा पंधरे यांनी केले.
Previous Post Next Post