सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विदर्भ तेली समाज महासंघ मारेगाव यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
श्री संताजी जगनाडे महाराज यांनी जीवनात संघर्ष करुन तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत ग्रंथ लिखाणाचे काम करीत असताना त्यांना अथक परिश्रम घावे लागले. तुकारामांचा इतिहास जीवित करण्याच सर्वोत्तम कार्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांनी केले असे मान्यवारांनी आपल्या भाषणातून सांगितले.
मारेगाव येथे आयोजित कार्यक्रमात तालुका महासंघाचे अध्यक्ष भास्कर मलकापुरे यांनी श्री संताजी जगनाडे महाराजांना हारार्पण करून अभिवादन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमराज कळंबे यांनी केले व संचालन सचिव बंडु गोलर यांनी तर आभार प्रदर्शन राजेन्द्र पोटदुखे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शशिकांत आबंटकर, विलास पिपराडे, दिपक उरकुडे, मलकापुरे सर, व समाज बांधव उपस्थित होते.