वाघाचे हल्यात महिला ठार : पाहार्णी येथिल घटना

सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : नागभिड वन परिक्षेत्रातील पाहार्णी येथिल वनिता वासुदेव कुंभारे (५७) ही महिला स्वता: चे शेतात गवत कापत असतांना हल्ला करून ठार केल्याने परिसरात दहशत पसरली आहे.नागभिड वन परिक्षेत्रात वन्यप्राण्याचे मानवी सर्घषात दिवसेंदिवस वाढ होत असुन अनेकांचे जीव वन्यप्राण्यांचे हल्यात गमावले असुन आज दि.२६ नोव्हेबर ला ६.३० वाजता चे दरम्यान पुन्हा पाहार्णी येथिल एका महिलेला वाघाने ठार केल्याने या परिसरात नरभक्ष वाघाचे अस्तित्व असल्याने जनतेत भिती निर्माण झाली आहे. नागभिड वन परिक्षेत्रातील वनकर्मचारी नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी एकिकडे मग्न असताना दुसरीकडे लोकांना नरभक्षक वाघ आपले भक्ष बनविण्यात यशस्वी होत असल्याचे दिसून येते आहे. वन्यजीव व मानवी सर्घष कसा टाळता येईल यासाठी वरिष्ठ स्तरावर योग्य उपाययोजना कराव्यात व नागभिड वन परिक्षेत्रातील वन्यप्राण्यांचे मानवी हल्ले त्वरीत थांबवावे असी मागणी नागभिड तालुक्यातील जनता करीत आहे.
Previous Post Next Post