कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मृतक अजय कुचनकर रा. मांगरूळ असे त्या अपघातातील युवकाचे नाव आहे. मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथील कुचनकर कुटूंबातील वडील,आजी आजोबा,काका-काकु ही मांगरुळ येथे वास्तव्यास असुन, आई दुर्गा कुचनकर व बहीण कु.साक्षी कुचनकर ही मुबंई येथे एका कंपनीत कामाला आहे. दिवाळी सणानिमित्त तो आई व बहिणीकडे काल यवतमाळ वरुन मुबंई साठी एका खासगी ट्रॅव्हल्स ने निघाला होता.
अशातच आज शनिवारी पहाटे च्या सुमारास नाशिक शहरातील तपोवनाजवळ त्या ट्रॅव्हल्स ट्रक चा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत जवळपास बारा व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. यापैकी चार व्यक्तीची ओळख पटली; एका बालिकेचा समावेश, जखमींचा आकडा पोहचला ४३ वर अशी माहिती समोर येत असुन, त्यात मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथील अजय मोहन कुचनकर या 17 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जखमींची नावे खालीलप्रमाणे - अजय शेषराव देवगण (२३, रा. यवतमाळ), ज्ञानदेव नथू राठोड (३८, रा.पुसद), दीपक बजरंग शेंडे (४०, रा.यवतमाळ), भगवान श्रीपाद मनोहर (६५, रा.वाशिम). सतीश बाबूराव राठोड (२८, रा.यवतमाळ), निकिता नामदेव राठाेड (२६, रा. यवतमाळ), प्रभादेवी केशव जाधव (५०, रा. वाशिम), भागवत लक्ष्मण भिसे (५८, रा.डोंबिवली), स्वरा ज्ञानदेव राठोड ( २, रा. यवतमाळ), रेहाना पठाण (४५), फरिना पठाण (२२), जैतुलबी पठाण (४५), राहत पठाण (९, सर्व. रा.मुंबई), मालू चव्हाण (२२, रा.मुंबई), अमित कुमार (३४, रा.यवतमाळ), सचिन जाधव (३०), अश्विनी जाधव (२६, दोघे रा. पुसद), हंसराज बागूल (२६, रा.कसारा), पूजा मनोज गायकवाड (२७,), आर्यन गायकवाड (८ दोघे रा. यवतमाळ), मीरा राठोड (६०, रा.यवतमाळ), संतोष सरदार (४५, रा. ४६, रा.भिवंडी), लखन राठोड (२९, रा.यवतमाळ), विशाल पतंगे (२०, रा.बुलडाणा), कुश जाधव (८, रा. यवतमाळ), साहेबराव जाधव (५०, रा.वाशिम). गणेश लांडगे (१९, रा.मुंबई), इस्माईल शेख (४५, रा.केवड), अंबादास वाघमारे (५०, रा.यवतमाळ), पायल रमेश शिंदे (५०, रा. जालना), चेतन आकाश (४), किरण चौगुले (१२, रा.वाशिम). अनिता सुखदेव चौगुले (३५, रा. यवतमाळ), अनिल चव्हाण (२८, रा.पुसद), महादेव धोत्रे (३०,रा.वाशिम).