सह्याद्री चौफेर | न्यूज
स्वतंत्र भारताच्या लोकशाही राजास अर्थात मतदारास विनम्र आवाहन...
चामोर्शी (घोट) : येत्या 16 ऑक्टोबर 2022 ला रोजी घोट ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. ग्रामपंचायतचा विकास आराखडा, गावातील नागरिकांच्या सामग्र विकासासाठी आम्ही "सर्वपक्षीय ग्राम पॅनल" आपल्या शतशः आशीर्वादाने पॅनल घेवून उमेदवारी दाखल केली आहेत.
ग्रामपंचायतच्या स्तरावरील मानवी हक्कावर आधारित विकास प्रक्रिया राबविण्यात आम्ही कटीबद्ध राहणार आहे. गांव विकासाच्या दूरदृष्टीने विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत प्रशासनाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी तथा गावातील नागरिकांच्या सुयोग्य मदतीने आराखडा करावयाचे असल्याची प्रामाणिक व सुबक कल्पना कृतीत उतरवून गांव सर्वांगसुंदर घडविण्याचा आमचा मानस आहे.
गावापातळीवरील पायाभूत सुविधांचा विकास त्यात प्रामुख्याने नागरिकांची मूलभूत गरज असलेल्या विज, पाणी, आरोग्य, शिक्षण, डिजिटल वाचनालय, वृद्धाच्या विरंगुळेकरिता बगीचा, युवकांकरिता क्रिडांगण, गावातील रस्ते नालीसह विविधांगी उपाय योजनेवर आम्ही सर्व उमेदवार भर देऊन आपल्या सहकार्यातून गावातील नागरिकांचा व गावचा शास्वत विकास होईल असा आमचा सदैव प्रामाणिक प्रयत्न असेल.
ग्रामपातळीवर पक्ष, गट तटाला बगल देऊन सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक उपाययोजना आपल्या सहकार्याने व आशिर्वादाने विकासाभिमुख योजना राबविण्यासाठी आणि त्याचा अमल करण्यासाठी हा आमचा नियोजित जाहीरनामा...!
मायबाप, भाऊ-ताई आपले अमूल्य मत गांव पातळीवरिल विकासाचा वाटा पदरी पाडण्यासाठी आम्ही "सर्वपक्षीय ग्राम पॅनलचे सरपंच पदाकरिता (अनुसूचित जाती) उभे असेलेले लाकडे दिनकर अभिमान यांचे बोधचिन्ह "अंगठी" तसेच
कारपेनवार अर्चना जयंत (अनुसूचित जमाती -स्त्री- अधिकृत उमेदवार) प्रभाग क्र.1 बोधचिन्ह "कपाट", गण्यारपवार करण अरुण (सर्वसाधारणचे अधिकृत उमेदवार) प्रभाग क्र.1 बोधचिन्ह "फुगा", दूधबावरे शितल पवन (नामाप्र -स्त्री चे अधिकृत उमेदवार) प्रभाग क्र.1 बोधचिन्ह "करवत" हे आहेत.
भोंगाडे रोहित चंद्रशेखर (अनुसूचित जाती चे अधिकृत उमेदवार) प्रभाग क्र.2 बोध चिन्ह "कपाट", उईके श्रीचंद चंद्रपाल (अनुसूचित जमातीचे अधिकृत उमेदवार) यांचे बोधचिन्ह "करवत", तसेच सर्वसाधारण (स्त्री) चे अधिकृत उमेदवार चलाख किरण महेंद्र प्रभाग क्र.2, यांचे बोधचिन्ह "विजेचा खांब" हे आहेत.
उपाध्ये आशा हेमंत (सर्वसाधारण -स्त्री- चे अधिकृत उमेदवार) प्रभाग क्र.3 बोधचिन्ह "ब्रश", सिडाम वैशाली संजय (सर्वसाधारण -स्त्री- चे अधिकृत उमेदवार) यांचे बोधचिन्ह "कपाट", तसेच (नामाप्र चे अधिकृत उमेदवार) सोनटक्के संदीप नामदेव प्रभाग क्र.3, यांचे बोधचिन्ह "केक" हे आहेत.
शेट्ये वर्षा अरुण (नामाप्र चे अधिकृत उमेदवार) प्रभाग क्र.4 बोधचिन्ह "जग", रंटकवार रुपाली रविंद्र (सर्वसाधारण -स्त्री- चे अधिकृत उमेदवार) यांचे बोधचिन्ह "ब्रश", तसेच (सर्वसाधारण चे अधिकृत उमेदवार) बकाले अरुण विठोबा प्रभाग क्र.4, यांचे बोधचिन्ह "करवत" हे आहेत.
कुणघाडकर माधुरी संजय (सर्वसाधारण चे अधिकृत उमेदवार) प्रभाग क्र.5 बोधचिन्ह "कपाट", अध्येंकिंवार अनुप अरुण (सर्वसाधारणचे अधिकृत उमेदवार) यांचे बोधचिन्ह "इस्त्री", तसेच (नामाप्र चे अधिकृत उमेदवार) कारपेनवार जयंत सुरेश प्रभाग क्र.5, यांचे बोधचिन्ह "केक" हे आहेत.
अंगठी, कपाट, करवत, केक, ब्रश, इस्त्री, जग, फुगा, व विजेचा खांब या सर्व बोधचिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन श्रीचंद चंद्रपाल उईके यांनी केले आहे.
टीप - निवडणूक दिनांक 16 ऑक्टोबर 2022 (रविवार), वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत.