चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
या वेळी विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, राष्ट्राभक्ती गीतगायन स्पर्धा, वृक्षारोपण तसेच प्रत्येक शिक्षकांने विद्यार्थ्यांना एकेका क्रांतिकारकाची माहिती दिली हा उपक्रम गेले पंधरा दिवसापासून सुरु आहे.
एन.सी सी च्या विद्यार्थ्यांचे पथक सुद्धा यावेळी होते एन. सी सी च्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली या आगळ्या वेगळ्या अमृत महोत्सवात विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी विद्यालयात व्यसनमुक्तीची शपथ घोडमारे सर यांनी दिली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत झाले, सूत्रसंचालन श्री बुजोने सर यांनी केले. एन सी सी पथकाचे संचालन मडावी सर यांनी केले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.