कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ द्वारा येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात पहिल्यांदाच भव्य रोजगार मेळावा (ता. 7 जुलै) रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी प्रथम ऑनलाईन गुगल वर लिंक (link) करून आपला फार्म (application) भरणे अनिवार्य आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ व लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिन दयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून, शहरात प्रथमच रोजगारांची सुवर्ण संधी प्राप्त होत असून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सह देशभरातील 12 नामांकित कंपन्याचा सहभाग असणार आहेत. त्यासाठी 2365 पदाची जंबो भरती होणार आहे.
या आयोजित रोजगार मेळाव्याचे उदघाटक मा खा बाळू धानोरकर उपस्थित राहणार आहेत तर विशेष अतिथी तथा मार्गदर्शक मा श्री अमोल येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ, प्रमुख पाहुणे मा श्री नरेंद्र नगरवाला अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ वणी, मा श्री संजय देरकर उपाध्यक्ष जिमस बँक मर्या.यवतमाळ, संयोजक अध्यक्ष म्हणून मा श्री टिकाराम कोंगरे अध्यक्ष जिमस बँक मर्या, यवतमाळ, श्रीमती विद्या शितोडे,प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे इत्यादी मान्यवर उपस्थिती राहणार आहे.
तेव्हा वणी उपविभागातील 10 वी, 12 वी आय टी आय (ITI), डिप्लोमा व पदवीधारक विद्यार्थी युवक युवतीनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा व सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
जाहिरात साठी संपर्क : 9011152179
लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 05, 2022
Rating:
