सह्याद्री चौफेर | न्यूज
शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्य बाण' वर दावा सांगण्यास सुरुवात केली.
बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहे
या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्देवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे - तसेच आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आता सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे.