धुवाधार पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांच्या शेतात घुसले बेंबळाचे पाणी

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील सिंधी येथील अनिल घुगल, घुलाराम टेकाम या दोन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बेंबळा प्रकल्पाचे पाणी कालव्याचे गेट बंद असल्याने कालव्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. ही शेती पाण्याखाली गेली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.            

मागील बारा तासापासून मुसळधार पाऊस सुरु असून बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्याखाली येवून वाया गेलेले आहेत.
सिंधी येथील शेतकरी घुलाराम टेकाम, अनिल घुगल या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना बेंबळा प्रकल्प यांच्याकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.