टॉप बातम्या

आजपासून वणी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय पुढील 48 तासासाठी "बंद"

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : मागील 5 ते 6 दिवसापासुन वणी तालुक्यात सतत पाउस सुरु असल्यामुळे तालुक्यातील सर्व नदी नाले ओढे दुथडी भरुन वाहात आहे. तसेच जवळपास सर्वच नदी व नाल्याच्या पुलावरून पाण्याचा प्रवाह वाढत आहे.
वणी तालुक्यात शहरात व आजुबाजुच्या परीसरात स्थित असलेल्या शाळा व महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातुन ये- जा करतात. तालुक्यातील पुर परिस्थिती पाहता आज 15 ते 16 जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले. 

त्याअनुषंगाने तालुक्यातील पुरपरीस्थीती पाहता कोणताही अनुचित प्रकार घडु नये याकरीता खबरदारी म्हणुन वणी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय पुढील 48 तासाकरीता अथवा पुराचे पाण्यामुळे होणा-या संभाव्य धोक्याची संभावना कमी होई पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेश निवासी जिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे यांनी जारी केले आहे.
      बातमी व जाहिरातसाठी संपर्क : 9011152179

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();