टॉप बातम्या

विठ्ठलवाडी येथील अपघतात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : विठ्ठलवाडी येथील अपघतात जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. येथील ही दुसरी घटना असल्याने विठ्ठलवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. या आधी लालपुलिया परिसरात एका व्यावसायिक तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता.
ओम अनिल आगलावे (२१) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या उमद्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यु झाल्याने विठ्ठलवाडी परिसरात हळहळ होत आहे.
शहरातील विठ्ठलवाडी येथे राहत असलेला ओम आगलावे हा तरूण ६ जूनला सायंकाळी मोटारसायकल ने वरोऱ्याला आत्याकडे जात असतांना वरोरा रोड वरील टोल नाका जवळ त्याचे दुचाकी वरील अचानक नियंत्रण सुटले व तो रस्त्याच्या बाजूला जावून पडला.
या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला ताबडतोब चंद्रपुराला हलविण्यात आले. चंद्रपुर येथील एका खाजगी रुग्णालयात त्याचे वर उपचार सुरु होता. उपचारादरम्यान, काल (१० जून) रोज शुक्रवारला दुपारी ओम'ने अखेरचा श्वास घेतला.

Previous Post Next Post