गेल्या 15 दिवसापासून मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे भरती असलेला अनोळखी इसमाचा मृत्यू

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : राज्य महामार्गावर एकटाच भटकत असलेल्या अनोळखी इसमाची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना मारेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा आज 10 जून शुक्रवारला मृत्यू झाला. अजून पर्यंत त्यांची ओळख पटली नसून छायाचित्रावरून ओळख पटल्यास मारेगाव पोलिस स्टेशन तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.      
शहरात मागील अनेक दिवसांपासून यवतमाळ-मारेगाव राज्य महार्गावर एकांतवासात जीवन जगणारा (अंदाजे ५५) वर्षीय इसमाची प्रकृती बिघडली. आरोग्य विभागास माहिती होताच त्यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. भुकेने व्याकुळ आणि अशक्तपणा यामुळे ते काहीच बोलत नव्हते. मराठी भाषा बोलणारा हा अनोळखी इसम पाण्याशिवाय काहीच मागत नव्हता. अशातच स्वतःचे नाव सांगण्याची तसदी घेत नव्हते. त्यामुळे नाव व गाव प्रशासकीय दप्तरात नोंद घेणे अवघड झाले. अशातच मागील पंधरा दिवसापासून रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. ओळख पटली नसल्याने त्यांना शवपेटीत ठेवण्यात आले आहे.     
सदर इसम काळी पॅन्ट, पांढरा शर्ट व दाढी वाढलेल्या अवस्थेत आहे. कुणास ओळख पटल्यास मारेगाव पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन ठाणेदार राजेश पुरी, बिट जमादार आनंद आलचेवार यांनी केले आहे.