कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : पाच महिन्याच्या प्रदिर्घ काळच्या संघर्षानंतर एसटी कर्मच्यारयांचा संप कोर्टाच्या मध्यस्तीने काही दिवसापुर्वीच मागे घेण्यात आला आहे. आता बसेसच्या नियमित फेऱ्या सुरु झाल्या असलेल्या त्या फेऱ्या सुरळीत वेळेवर ये-जा करीत नसल्याने प्रवासी नागरीकांचे फार हाल होतांना दिसत आहे. तसेच कर्मचारी चालक वाहकाना विश्रांती न देता एक फेरी मारुन आल्या नंतर दुसऱ्या फेरीला पाठवून त्यांना नाहक मानसिक त्रास देण्याचे काम एसटी महामंडळाचे अधिकारी करीत असल्याच्या तक्रारी एसटी कर्मचाऱ्यात वाढत असून, अधिकाऱ्यांच्या या वर्तनाने कर्मचारी धास्तावलेले आहेत.
काही कडून जबरदस्तीने जास्तीचे कम करुन घेत असतांना काही वाहक व चालक आपल्याला काम मिळावे म्हणून कामाचे प्रतिक्षेत एस टी आगाराचे प्रतिक्षालयासमोर बसलेले दिसते आहे. तेव्हा प्रत्येक कर्मच्याऱ्यांना काम देण्यात यावे, एकाच कर्मचाऱ्याला एक फेरी मारुन आल्यानंतर लगेच पलटुन दुसऱ्या फेरी वर विना विश्रांती पाठवू नये.
झरी पाटण दुपारची फेरी दुपारी ०३,०५ व हलटिंग ७:३० देण्यात यावी. तसेच वणी राळेगांव दुपारी ०४ वा. सह सायंकाळी ६:३० करण्यात यावी,अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल आघाडी तथा अ.भा.संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.