दखल न्युज भारत चे संपादक जगदीश वेन्नम यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
गडचिरोली : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगर-दऱ्यामध्ये वसलेल्या रेगुंठा येथील उच्च शिक्षित युवक दखल न्यूज भारत चे संपादक मा.जगदीश वेन्नम यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय सम्मान २०२२ चे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
एकता फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा पुरस्कार म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक कार्यकर्ते व बचाव कार्य,मदत कार्य,किंवा पत्रकारिता व सुशिक्षित युवकांना दिले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्य स्थरावर गडचिरोली चे जगदीश वेन्नम यांचे पत्रकारिता, सामाजिक कार्य,हेलपिंग कार्य आधारे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी टरून जिल्ह्यात मानाचा तुरा रोवले करिता जिल्ह्यात अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.
दखल न्युज भारत चे संपादक जगदीश वेन्नम यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 25, 2022
Rating:
