सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : रेती घाटांचा लिलाव होऊन अधिकृतरीत्या रेतीघाट सुरु झाल्याने रेती चोरीवर अंकुश लागला असून भरमसाठ किंमतीत मिळणारी रेती आता वाजवी दरात मिळू लागली आहे. त्यामुळे घरांच्या बांधकामाचा खर्च बराच कमी झाल्याने घरांचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनाधिकृत रेती खरेदी करतांना मोठी रक्कम मोजावी लागत होती. पण आता अधिकृतपणे कमी भावात रेती मिळू लागल्याने शहर व तालुक्यात बांधकामांनाही जोर आला आहे. असे असले तरी दोन ब्रास रेतीची रॉयल्टी असतांना ट्रक व टिप्परमध्ये सहा ते नऊ ब्रास पर्यंत रेती आणली जात असून शासनाची शुद्ध फसवणूक केली जात आहे. महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून रेती माफिया आपला डाव साधत आहे. दोन ब्रास रेतीची नाममात्र रॉयल्टी घेऊन वाळू माफिया सहा ते नऊ ब्रास पर्यंत रेती ट्रकांमध्ये भरून विक्री करिता आणत आहेत. रेतीची ही ओव्हरलोड वाहतूक कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे, हा चर्चेचा विषय ठरला आहे. दोन ब्रास रेतीच्या रॉयल्टीवर ६ ते ९ ब्रास रेती ट्रकांमध्ये भरली जात आहे. या ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची हालत खस्ता होत असून कित्येक गटारांची पाईपलाईनही या ओव्हरलोड ट्रकांमुळे फुटली आहे. २ ब्रास रेतीची रॉयल्टी असतांना ६ ते ९ ब्रास रेती ट्रकांमध्ये भरून विक्री होत असतांनाही प्रशासन गप्प का, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. रेतीच्या या ओव्हरलोड वाहतुकीला व विक्रीला पाठबळ कुणाचे, या चर्चेलाही पेव फुटले आहे. ज्याठिकाणी छोटी वाहने जाण्यास अडचणी येतात, त्याठिकाणी रेतीचे ट्रक टाकले जात आहे. शहरातील अरुंद रस्त्यांवरून रेतीचे ट्रक वाहतूक करित असल्याने रस्त्यांवर नेहमी जाम लागताना दिसतो. टोल नका वाचविण्याकरिताही शहरातून रेतीचे ट्रक आणले जातात. परंतु प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. रॉयल्टी दोन ब्रास रेतीची व ट्रकमध्ये ६ ते ९ ब्रास रेती भरून सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरु असतांना देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. २ फेब्रुवारीला अशाच एका ओव्हरलोड रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर महसूल विभागाने कार्यवाही केली होती. दोन ब्रास रेतीची रॉयल्टी असतांना सहा ब्रास रेती ट्रकमध्ये भरून विक्री करिता आणत असतांना महसूल विभागाने हा ट्रक ताब्यात घेतला होता. परंतु असाच डाव नित्यनियमाने साधला जात आहे. ओव्हरलोड रेतीची वाहतूक व विक्री जोमात सुरु आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून २ ब्रास रेतीच्या रॉयल्टीवर ६ ते ९ ब्रास रेती ट्रकांमध्ये भरून आणली जात आहे. ट्रकांमध्ये रेती भरण्याकरिता रेती घाटावर मोठमोठ्या पोकलँड मशिनी लावण्यात आल्या आहेत. रॉयल्टी २ ब्रास रेतीची व ट्रकांमध्ये ६ ते ९ ब्रास रेती भरण्याचं गणित कुणाकडून शिकवलं जात आहे, व हे गणित शिकवणारा नेमका कोण आहे, या चर्चेला शहरात उधाण आले आहे. रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांच मोठं नुकसान होत असून २ ब्रास रेतीच्या रॉयल्टीवर ६ ते ९ ब्रास रेती ट्रकांमध्ये भरली जात असल्याने शासनाचीही फसवणूक होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.