हरिभाऊ कुमरे यांचे वृद्धापकाळाने निधन, पं स सदस्य धनराज कुमरे यांना पितृशोक


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : पं स सदस्य धनराज कुमरे यांचे पिताश्री काँग्रेसचे जेष्ठ नेते हरिभाऊ शिवराम कुमरे (वय ९५) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पत्नीचे गेल्या आठवड्यात नुकतेच निधन झाले होते. ते वणी जय परसापेन वसतिगृहाचे (१९६९) संस्थापक अध्यक्ष होते, तसेच ते काँग्रेस स्थापनेपासून सक्रिय काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात परिचित होते.

त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज शनिवार दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी मच्छिन्द्रा ता. मारेगाव जि. यवतमाळ या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे पं स सदस्य धनराज कुमरे यांनी सांगितले.
हरिभाऊ कुमरे यांचे वृद्धापकाळाने निधन, पं स सदस्य धनराज कुमरे यांना पितृशोक हरिभाऊ कुमरे यांचे वृद्धापकाळाने निधन, पं स सदस्य धनराज कुमरे यांना पितृशोक Reviewed by सह्याद्री चौफेर on January 15, 2022 Rating: 5
Powered by Blogger.