सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (२ आक्टो.) : श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयांमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी राष्ट्रीय सेवा योजना एन सी सी आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर.ए. जलतारे सर तर प्रमुख उपस्थिती म्हणून मेजर प्राध्यापक एक व्ही रेळे सर रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर रंजना महाजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सत्तुरवार सर तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक एनसीसी कॅडेट आणि एम एस एस चे स्वयंसेवक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या निमित्त महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉक्टर जलतारे सरांनी विद्यार्थ्यांना गांधीजी आणि शास्त्रींचे जीवन कार्य याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर कनाके सर तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सत्तूरवार सर यांनी केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला सदर कार्यक्रम संपल्यानंतर महाविद्यालयामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.