सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२ आक्टो.) : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत रोजगार सेवकांची संखा २८,१४४ ऐवढी महाराष्ट्रात असुन राज्य सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजने अंर्तगत ग्राम पंचायत ग्राम सभेतुन ग्राम रोजगार सेवकांची ग्रामसभेद्वारे नियुक्ती केली आहे.
या ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करता आले नसल्यामुळे या ग्रांमरोजगार सेवकांनी दिनांक २ आक्टोबर रोजी तहसिल कार्यालयासमोर सकाळी दहा वाजल्यापासुन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे .
राज्यामध्ये सन २००६ पासुन आजतागायत राज्यात एकुण २८,१४४ रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकिय खर्च याच्या निधीतुन सहा टक्के मानधनावर कार्यरत असुन सन २००६ पासुन गेल्या पधरा वर्षापासुन ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवक म्हणुन काम करतात . प्रत्येक पंचवार्षीक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रांमपंचायत पँनलच्या माध्यमातुन नविन ग्रामपंचायत सदस्य व संरपंच यांची निवड होते . पण राज्यामध्ये बराच ग्रांमपंचायतीमध्ये संत्तातर झाल्यावर सुडबुद्धीने ग्रामरोजगार सेवकावर खोट्या प्रोसिडीगद्वारे कामावरुन कमी करुन जाणिवपुर्वक अन्याय करुन त्याला कामावरुन कमी केला जातो .
त्यामुळे हि बाब अत्यत गंभिर असुन त्यामुळे या ग्रामरोजगार सेवकांना माणसिक त्रास कोणकोणत्या निर्णयाला सामोरे जावे लागते .
त्याच्या कुंटुबांची पालनपोषणाची जिम्मेदारी कुंटुबप्रमुख म्हणुन रोजगार सेवकावर असल्याने त्याचा कुंटुबावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यावर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे .
राज्यातील ग्रामरोजगार सेवक यांना ग्रांमपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेउन राज्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम स्वरुपी नियुक्ती करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
यावेळी संजय प्रकाशराव देशमुख अध्यक्ष, अवधूत नागोराव कदम उपाध्यक्ष, सुभाष सोमला राठोड सचिव, सुभाष बन्सी राठोड, किसन काळू खंडागळे, सुभाष मेगा राठोड, बाळू संपत जाधव, हनुमान रामचंद्र गायकवाड, देविदास किसन राठोड, प्रवीण दिपकराव भांगे, संतोष भोजु जाधव, विश्वनाथ नारायण डोके, आनंदराव भुजंगा साखरे, अनिल निवृत्ती लोखंडे, विलासराव गणपतराव पतंगराव, शामराव मंगलसिंग बिडवाळ, नेताजी नामदेव वाघ, संतोष दिगंबर असोले, लक्ष्मण राठोड, सुधाकर मोहन चव्हाण, प्रदीप परसराम राठोड, सुरेश प्रेमदास राठोड, आशिष विठ्ठल बोके, दत्तराव अमृतराव देशमुख, प्रदीप आनंदराव शिंदे, किसन वसराम राठोड, गजूसिंग सकू राठोड, सुभाष शंकर नांदे, गजानन अवधूतराव सोळंके, दिलीप मोहन पवार, अरविंद कचरु पाईकराव, विजय बापूराव माटाळकर, भगवान किसन भांडवले, रामदास विठ्ठल श्रीनाथ, दिनेश पिंटू चव्हाण, दिलीप नुरा राठोड, संजय महादु कांबळे, गणेश सुकळकर, गणेश आडे, गजानन मोहनसिंग राठोड, गजानन काशिनाथ बावणे, प्रल्हाद कदम, गजानन हरणे, रामेश्वर नामदेव पवार, आशिष भगवान गावडे इ. ग्रामरोजगार सेवक उपस्थीत होते.