टॉप बातम्या

भांडणात एकाच्या डोक्यात घातला दगड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : पत्याचा जुगार खेळत असताना वाद निर्माण होऊन एकाने रागाच्या भरात त्‍याने डोक्‍यात दगड घातला. त्‍यात एकजण रक्तस्त्राव होऊन जागीच ठार झाला. गणेशपूर स्मशानभूमीच्या परिसरात बुधवारी (ता. २०) संध्‍याकाळी हा प्रकार घडला.

संजय प्रभाकर कावरे (वय ४२, रा. गणेशपूर, ता. वणी), असे मृतकाचे नाव असून, याप्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेतलं आहे. याबाबत माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी संजय कावरे व त्‍याचा मित्र जुगार खेळण्‍यासाठी गणेशपूर स्मशान भूमी परिसराच्‍या मोकळ्या जागेत गेले होते. त्‍यात आरोपी संदीप सुर्यभान इसापुरे हे सुद्धा होते. जुगारात वाद निर्माण झाला. त्याचा राग येऊन संदीप याने जवळच असलेला दगड संजय याच्‍या डोक्‍यात घातला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. यातील आरोपी अटकेत असून, सदर घटनेचा अधिक तपास सुरु आहे. 

वणी पोलीस स्टेशन हद्दीत खुनाची घटना ही दुसरी असल्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण असून शांतताप्रिय शहराला अशा लगत क्रूर घटनेने गालबोट लागत असल्याचे बोलल्या जात आहे.
Previous Post Next Post