सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : दिनांक 13/08/2025 रोजी, कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण दीपक चंद्रप्रकाश वानखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, आदिलाबाद येथील दोन इसम वाघदरा फाटा येथे अनधिकृत फवारणी औषधांची विक्री करत आहेत. त्यांनी तत्काळ वरिष्ठ कार्यालयाला याची माहिती दिली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (L.C.B.) सहाय्यक पोलीस निरीक्षक (A.P.I.) दत्ता पेंडकर यांना कारवाईसाठी विनंती केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथक, पंच आणि कृषी विभागाचे अधिकारी रविंद्र भोजने, देवेंद्र पाचभाई, विश्वास फुलमाळी यांनी संयुक्तपणे वाघदरा फाटा येथे सापळा रचला.
सायंकाळी 7:00 वाजता, MH-29 R-3029 क्रमांकाची मारुती सुझुकी कार संशयास्पद स्थितीत आढळून आली.कारमध्ये असलेले दोन इसम नामे योगेश गुणवंत देशमुख, वय 44 वर्ष, रा. बेला, जि. आदिलाबाद (तेलंगणा) व सचिन शंकर उरकुडे, वय 40 वर्ष, रा. बेला, जि. आदिलाबाद (तेलंगणा) या दोघांच्या ताब्यातून अनधिकृत फवारणीची औषधचे 80 बॉक्स व 10 बॉटल ज्याची किम्मत 214190 रुपये व मारुती सुझुकी कार (MH-29 R-3029) किंमत 3,00,000/-असा एकुण 514190 मुद्देमाल मिळाला.
आरोपी हे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले फवारणीचे औषध अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि शेतकर्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
सदरचा गुन्हा दिनांक 14/08/25 चे रात्री 02/44 पोलीस स्टेशन वणी येथे दखल करण्यात आला असुन त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 318(4),कलम 3(5) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन वणी करत आहे.