टॉप बातम्या

शाळेत सतत गैरहजर राहणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शाळेला सतत,मनमर्जीने दांडी मारणाऱ्या जि प च्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी मांगरूळ येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य आणि पालकांनी गटशिक्षणाधिकारी पं स मारेगाव यांचेमार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना केली. 

जि प शाळा मांगरूळ येथील एक शिक्षक सतत गैरहजर असतात, शाळा सुरु असताना मधात शाळा सोडून पसार होतात,विद्यार्थ्यांना शिकवीत नाही,दिवभर नुसते मोबाईल इचकत बसतात,रील पाहतात आणि सांगतात ऑनलाईन कामे करीत आहे, तसेच शाळेत नशापानी करून येतात असे निवेदन कर्त्यांचे म्हणणं आहे. त्या शिक्षकाची बदली करा आणि नवीन शिक्षक द्या अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

शिक्षकांनी शाळेत नियमितपणे उपस्थित राहणे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक असताना मुख्याध्यापक ताजने हे वारंवार गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्वरित बदली करावी व नवीन शिक्षकाची नेमणूक करावी,अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आली आहे.

निवेदनावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर गेडाम,शा.व. उपाध्यक्ष सौ संगीता टोंगे, सदस्य प्रियांका पाल, सौ.रंजना टोंगे, सौ नीता राजूरकर, जगदीश ठेंगणे, पालक दत्तात्रय चौधरी, सौ वर्षा गेडाम, अविनाश घुगुल,सौ अमृता घुगुल,माजी सरपंच अतुल वटे, गावकरी गणेश टोंगे, निलेश भोयर, प्रवीण मोहितकर, लक्ष्मण कोरझर, संजय नैताम, संगीता टोंगे, अनिता भोयर, कांता भोयर, शीतल कोल्हे, आयुष खिरटकार, सुनीता जोगे, गजानन जोगे, व वृंदा नैताम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आम्हाला शुक्रवारीच तोंडी तक्रार प्राप्त झाली होती,त्याअनुषंगाने केंद्र प्रमुख मार्फत मी चौकशी लावली. त्यांचा अहवाल सुद्धा प्राप्त झाला. त्या अहवाल वरून मी गुरुवारीच संबंधित शिक्षकाला show cause दिली आहे.

-एस ए काटकर
गटशिक्षणाधिकारी पं स मारेगाव 

Post a Comment

Previous Post Next Post