सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
फिर्यादीच्या माहितीनुसार, ओम (१७) हा दहावीचा विद्यार्थी असून तो आपल्या कुटुंबासोबत भांदेवाडा कॉलनी येथे राहतो. तो १७ ऑगस्टला सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत गावातीलच एका पानठेल्यासमोर उभा असतांना एका अल्पवयीन तरुणाने त्याला 'मी तुला मारून टाकतो' अशी धमकी दिली.
त्यानंतर ही बाब त्याने आपल्या वडिलांना सांगितली. विद्यार्थ्याचे वडिल शंकर यादव खापणे (४६) यांनी घटनास्थळी येऊन मुलाला जीवे मारण्याची धमकी का दिली अशी विचारणा केली असता त्या अल्पवयीन मुलासोबत तेथे उपस्थित असलेल्या पियूष बरडे (२३) व पियूष चव्हाण (१९) या दोघांनी वादात उडी घेतली. ते दोघेही ओमशी भिडले. पियूष बरडे व पियुष चव्हाण यांनी ओम याला गळा पकडून हाताबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच पियूष चव्हाण याने हातातील कड्यासारख्या वस्तूने ओमच्या कपाळावर व खांद्यावर मारून त्याला जखमी केले. त्याच्या कपाळावर जखम होऊन त्यातून रक्तस्राव होऊ लागला.
या तिघांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मुलाला वडिलांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ओमने पोलिस स्टेशनला येऊन या तीनही आरोपींविरुद्ध तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह पियुष बरडे व पियुष चव्हाण या तीन आरोपीवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.