Top News

विविध संस्था मदतीकरिता सरसावल्या : आदिम बांधवांना धान्य किट चे वाटप करून कोविड लसीकरणबाबत जनजागृती

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
किनवट, (१६ जुलै) :  मौजे शिवशक्ती नगर (कोलाम पोड) येथे इंडिया फुड बँकिंग नेटवर्क व अन्न छत्र फॉउंडेशन आणि विश्व् बहुउद्देशीय संस्था, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.१५ जुलै २०२१ ला कोलाम पोड येथील आदिम बांधवाना अन्न धान्यचे ५० किट तसेच लहान मुलांना गोळ्या बिस्कीट चॉकलेट वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महिला उद्योजीका सौ. अरुणाताई पुरोहित यांनी प्रथमतः covid-19 vaccine बद्दल माहिती दिली आणि vaccine सर्वांनी लस घेतली पाहिजे आग्रही विनंती सुद्धा केली. उपस्थित सर्व गावातील महिलांना सक्षमीकरण, शिक्षण व आरोग्य विषयी चांगले मार्गदर्शन केले. तसेच डॉ. चंद्रकांत कापसे (के.वाय.सी. आयुक्त नागपूर) कार्यक्रमात बोलताना, वन उपयोजिका तसेच वनातील असणाऱ्या गावातील वैद्य च्या माध्यमातून वनात असणारे अनेक वैद्यकीय वनस्पतीचा उपयोग करून व बांबू पासून विविध सुशोभिकरण वस्तू बनवणे यापासून गावाला सक्षम करता येईल असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक संचालन श्री. अनिरुद्ध केंद्रे सर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. श्री विवेक अवचत सर (हाय कोर्ट नागपूर), श्री भालचंद्र गावंडे सर (डी.पी.आर. अमरावती), आणि गावातील सर्व ग्रामस्थ तसेच विश्व् बहुउद्देशीय संस्थाचे संचालक मंडळ, श्री.मारोती आत्राम (सरपंच), श्री.संतोष मरस्कोल्हे, श्री.रामकृष्ण केंद्रे सर, श्री.केदार वट्टमवार, श्री.देवराव एंड्रलवार, श्री.दत्ता वेट्टी, कु.कोमल मरस्कोल्हे, सौ.वर्षा केंद्रे, कु.अश्विनी दंडजे, कु. काजल शेडमाके, भीमाबाई आत्राम, पुंडलिक उईके, नागोराव तुमराम, प्रकाश शेडमाके, भीमराव आत्राम, जंगू मडावी, गणेश धुर्वे आदीसह गावातील महिला, पुरुष व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post