घाटंजीत उमटले स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
घाटंजी, (५ जुलै) : एमपीएससी (Mpsc) चा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. याला जबाबदार कोण? यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांना घाटंजी तहसीलदार पुजा माटोडे यांच्या हस्ते मनसे विध्द्यार्थी सेना घाटंजी तर्फे निवेदन देण्यात आले.

स्वप्नील लोणकर ह्याच्या आत्महत्येमुळे घाटंजी शहरांतील मनसे विद्यार्थी सेना च्या विद्यार्थीनी तर्फे सरकारचा जाहीर निषेध करीत शासनाने लवकरात लवकर एमपीएससी (Mpsc) च्या परीक्षा घेऊन लवकरात लवकर नियुक्त्या जाहीर कराव्या अशी मागणी केली.

अन्यथा.. आम्ही मनसे विध्दार्थीसेने तर्फे मुख्यमंत्र्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करु असे, घाटंजी येथील मनसे विध्दार्थी सेनेचे अध्यक्ष नयन बोबडे व गोपाल निबुदे, रोहण बोबडे, रुपेश राउत, रुषिकेश टाले, यांनी मुलाखतीद्वारे सांगितले आहे.
  
Previous Post Next Post