टॉप बातम्या

उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक; एक ठार तर दोन जखमी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : वणी-यवतमाळ महा मार्गावरील सोमनाळा (निंबाळा) फाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव चारचाकी कारने जोरदार धडक दिली. यात कार चालकाच्या बाजूला बसलेला युवक जागीच ठार झाला तर, चालकासह कार मधील इतर एक जन गंभीर जखमी झाले. ही (ता.30 जुलै) रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
जखमींना तात्काळ शहरातील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.
सूत्राच्या माहितीनुसार ट्रक वणी-यवतमाळ राज्य मार्गावर ट्रक उभा होता. मारेगावकडून येत असलेली सँट्रो (Santro) कार सरळ उभ्या असलेल्या ट्रकच्या मागुन धडकली. या भीषण अपघातात अमोल देठे नामक इसम हा जागीच ठार झाला. तर लालसरे व मडावी हे जखमी झाले.
अपघातात मरण पावलेला व जखमी झालेले सदरहू युवक छोरीयातील रहिवासी असल्याचे कळते. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून, एकाला खाजगी रुग्णालयात उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. मृतक अमोल देठे (45) मुळ गाव भालर असून ते वेकोली  (wcl)मध्ये काम करित असल्याचे समजते. 

            जाहिरातसाठी संपर्क : 9011152179
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();