टॉप बातम्या

माकडाच्या अचानक उडीने दुचाकीस्वार कुटुंबाचा अपघात; तिघे जखमी

संग्रहीत छायाचित्र 

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : धावत्या दुचाकीवर अचानक माकडाने उडी घेतल्याने दुचाकीवरील आई-वडिलांसह दोन वर्षांची चिमुकली रस्त्यावर कोसळून जखमी झाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील कुंभा-महादापेठ मार्गावर रविवारी (५) रात्री घडली. या घटनेत माकडाचा जागीच मृत्यू झाला.

बोटोणी येथील अक्षय उईके हे पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी यांच्यासह माढेळी येथून दुचाकीने घरी परतत होते. दरम्यान, रस्त्यालगतच्या झाडांवर उड्या मारणाऱ्या माकडाने अचानक त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली. त्यामुळे दुचाकीचा ताबा सुटून तिघेही खाली पडले.

अपघातात तिघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने वणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती असून या घटनेत माकडालाही गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();